हाफीज सईदने दिले शिक्षेला आव्हान   

लाहोर : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने शिक्षेला आव्हान देणारा अर्ज येथील न्यायालयात दाखल केला आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्या प्रकरणात सईदला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सईद आणि जमात-उद-दावाच्या अन्य सदस्यांनी लाहोर उच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे. या अर्जाद्वारे शिक्षा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायाधीश शाहबाज रिझवी आणि न्यायाधीश तारिक महमूद बाजवा यांचा समावेश असलेल्या दोन सदस्यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी होणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. संयुक्त राष्ट्रांनी सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. तसेच, त्याच्यावर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

Related Articles